ज्या मुलांना आई / वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही नसतील , अशा बालकांना या योजना अंतर्गत लाभ दरमहा 2,250/- रुपयांचा लाभ मिळणार आहे .या योजनेची संपुर्ण माहिती त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत , अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता – राज्य शासनाच्या या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी बालकाचे वय 0 ते 18 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .तसेच सदर बालक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर मुलांना आई किंवा वडील नसावेत तसेच आई व वडील दोन्ही ही नसतील असे बालके या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील .
या योजना अंतर्गत किती रक्कम मिळते –
राज्य शासनाच्या बालसंगोपन योजना अंतर्गत एका मुलांसाठी 2,250/- रुपये प्रती महा ( एका वर्षाला 27,000/- रपये मिळणार आहेत .सदरची रक्कम सदर बालकाचे वय वर्ष 18 पुर्ण होईपर्यंत मिळणार आहे .
योजनेसाठी आवश्यक कागतपत्रे – आधार कार्ड , रेशनकार्ड , पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र , पालकाचा रहिवासी दाखला , उत्पन्नाचा दाखला , शाळेत असल्यास बोनाफाईट , मुलांचे बँक पासबुक , घरासमोर पालकासोबत / संगोपन करणाऱ्यांसाबत बालकांचे पोस्ट कार्ड मापाचा फोटो इत्यादी .
अर्ज कसा करावा ?
सदर योजनेस पात्र ठरणाऱ्या लाभार्थी आपला विहीत नमुन्यात अर्ज व आवश्यक कागतपत्रे घेवून आपल्या तहसिल कार्यालयांमध्ये जमा करावे लागते . सदरचे अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे जाते , बालविकास अधिकारी यांच्याकडून सदर अर्जास मंजूरी देण्यात येते . मंजुर झालेल्या लाभार्थ्यास मासिक 2,250/- प्रतिमहा रक्कम थेट बँक खात्यात मिळण्यास सुरुवात होते .
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !