केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांच्या एकुण 118 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Board Of Secondary Education Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 118 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रशासकीय स्वीय सहाय्यक | 18 |
02. | अकॅडमीक स्वीय सहाय्यक | 16 |
03. | स्कील शिक्षण स्वीय सहाय्यक | 08 |
04. | ट्रेनिंग स्वीय सहाय्यक | 22 |
05. | खाते अधिकारी | 03 |
06. | कनिष्ठ अभियंता | 17 |
07. | कनिष्ठ भाषांतर अधिकारी | 07 |
08. | अकाउंटेंट | 07 |
09. | कनिष्ठ अकाउंटेंट | 20 |
एकुण पदांची संख्या | 118 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.02 साठी : संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी B.ED व नेट / सेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी B.ED व नेट / सेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य / इकॉनॉमिक्स / वित्त / बिझनेस स्टडी / कॉस्ट अकांटींग अथवा पदवी + SAS / JAO किंवा पदव्युत्तर पद वी (वाणिज्य / इकॉनॉमिक्स / वित्त / बिझनेस स्टडी / कॉस्ट अकांटींग ) अथवा एमबीए / चार्टर अकौंटींग / ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.टेक ( सिव्हिल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता , हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.08 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य / इकॉनॉमिक्स / वित्त / बिझनेस स्टडी / कॉस्ट अकांटींग मध्ये पदवी व संगणकावर इंग्रजी 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.09 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.cbse.gov.in/cbsenew/recruitment.html या संकेतस्थळावर दिनांक 11.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती मध्ये पद क्र.01 ते 05 करीता 1500/- रुपये तर पद क्र.06 ते 09 करीता 800/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !