CAPF : 12 वी पात्रताधारकांसाठी केंद्रीय पोलिस दलांमध्ये 1526 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय पोलिस दलांध्ये 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 1526 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Armed Police Force Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -1526 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनोग्राफर / कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर ) व वारंट अधिकारी ( पर्सनल सहाय्यक )243
02.हेड कॉन्स्टेबल व हवालदार ( क्लर्क )1283
 एकुण पदांची संख्या1526

01.सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनोग्राफर / कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर ) व वारंट अधिकारी ( पर्सनल सहाय्यक ) पदांच्या फोर्सनिहाय रिक्त जागेसाठी संख्या पुढीलप्रमाणे ..

अ.क्रफोर्सचे नावपदसंख्या
01.BSF17
02.CRPF21
03.ITBP56
04.CISF146
05.SSB03

हे पण वाचा : क्षेत्रीय ग्रामीण बँका मध्ये तब्बल 9,995 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

02.हेड कॉन्स्टेबल व हवालदार ( क्लर्क )

अ.क्रफोर्सचे नावपदसंख्या
01.BSF302
02.CRPF282
03.ITBP163
04.CISF496
05.SSB05
06.AR35

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच डिक्टेशन 10 मिनिटे @80श.प्र.मि. लिप्यंतरण संगणकावर 50 मिनिटे ( इंग्रजी ) व 65 मिनिटे ( हिंदी ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि अथवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://rectt.bsf.gov.in/registration/ या संकेतस्थळावर दिनांक 08 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment