MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट अ व ब संवर्गातील 139 जागेसाठी पदभरती !

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट अ व ब संवर्गातील 139 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for various class a & b post , number of post vacancy – 139 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पोलिस उपअधिक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त04
02.सहायक राज्यकर आयुक्त79
03.सहायक कामगार आयुक्त01
04.सहायक आयुक्त कौशल्य विभाग02
05.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी21
06.उपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क03
07.मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी03
08.सहायक गट विकास अधिकारी15
09.उपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क01
10.सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
11.सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी04
12.मार्गदर्शन अधिकारी05
 एकुण पदांची संख्या139

आवश्यक अर्हता :

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : यांत्रिकी ( मेकॅनिकल ) / ऑटोमोबाईल अभियंता पदवी , जड वाहन चालविण्याचा परवाना ..

उर्वरित पदांसाठी : कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.07.2025 रोजी उमेदवाराचे वय 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास /आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 544/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.14.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment