केंद्र शासनांच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 249 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Steel Authority of india ltd . recruitment for various Post , Number of Post Vacancy – 249 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | केमिकल | 10 |
| 02. | सिव्हिल | 21 |
| 03. | कॉम्प्युटर | 09 |
| 04. | इलेक्ट्रिकल | 61 |
| 05. | इलेक्ट्रॉनिक्स | 05 |
| 06. | इन्स्ट्रुमेंटेशन | 11 |
| 07. | मेकॅनिकल | 69 |
| 08. | मेटलर्जी | 63 |
| एकुण पदांची संख्या | 249 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 65 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ,तसेच गेट 2024 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : केंद्र सरकारच्या विविध कार्यालयामध्ये 17,000+ जागेसाठी भरती ; Apply Now !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 25 जुलै 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sail.ucanapply.com/otr?app_id=UElZMDAwMDAwMQ== या संकेतस्थळावर दिनांक 25 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 700/- रुपये तर मागास प्रवर्ग /अपंग प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..