महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 हजार पदे भरण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे . यानुषंगाने राज्य शासन सेवेतील विविध विभागामधील मंजुर व रिक्त पदे राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आलेली आहेत . सर्वात जास्त रिक्त पदे ही गृह विभागांमध्ये असून , सर्वात जास्त मंजुर पदे देखिल गृह विभागामध्ये आहेत .
सध्या गृह विभागामध्ये एकुण 92,820 पदे मंजुर असून त्यापैकी 46,851 पदे रिक्त आहेत . म्हणजेच गृह विभागांमध्ये निम्मे पदे रिक्त असल्याने गृह विभागातील कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे . अनेक अधिकारी / कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे . यामध्ये प्रामुख्याने पोलिस संवर्गातील पदे रिक्त आहेत .यापैकी सध्या 18 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहेत .
त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने पद भरण्यात येत असल्याने , 62,358 मंजुर पदांकपैकी 23,112 पदे रिक्त आहेत .तर जलसंपदा विभागामध्ये 45,217 पदे मंजुर आहेत ,यापैकी 21,489 जागा रिक्त आहेत .तसेच महसून व वन विभागामध्ये 69,584 पदे मंजुर असून त्यापैकी 12,557 पदे रिक्त आहेत .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंजुर पदे 12,407 यापैकी रिक्त पदांची संख्या – 3,995 तसेच आदिवासी विकास विभागांमध्ये 21,154 पदे मंजुर असून , त्यापैकी 6,213 पदे रिक्त आहेत .तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 21,549 पदे मंजुर असून त्यापैकी 7,751 पदे रिक्त आहेत .सामाजिक न्याय विभागामध्ये 6,573 पदे मंजुर असून ,त्यापैकी 3,221 पदे रिक्त आहेत .
शालेय शिक्षण व क्रिडा विभागामध्ये 7,050 पदे मंजुर असून , त्यापैकी 3,828 पदे रिक्त आहेत .तर उद्योग , उर्जा व कामगार विभागांमध्ये 8,197 पदे मंजुर असून त्यापैकी 3,686 पदे रिक्त आहेत .
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !