तलाठी / मंडळ अधिकारी पदांची तयार करत असणाऱ्या उमेदवारांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे . ती म्हणजे तलाठी मेगाभरतीस राज्य शासनांकडून वेगवान हालचाली करण्यात येत आहेत . ती राज्या शासनाच्या महसूल विभागांकडून जाहीर केल्याप्रमाणे तलाठी पदांच्या तब्बल 4200 पदे तर मंडळ अधिकारी पदांच्या 528 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
तलाठी मेगाभरतीच्या धर्तीवर राज्य शासनांकडून राज्यातील 51 तलाठ्यांना मंडळाधिकारी पदांवर पदोन्नती देण्यात आलेली आहे . तर राज्यांमध्ये आता नव्याने 202 तलाठी सज्जा व 34 मंडळ कार्यालये मंजूर करण्यात आलेली आहेत .त्याचबरोबर तलाठी संवर्गातील पदे थेट सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी राज्यातील जिल्हा प्रशासनाकडून जमाबंदी विभागाकडे सदर पदभरतीचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे . नविन तलाठी सज्जे व मंडळ कार्यालये मंजूर केल्यामुळे आता महसूली काम काजासाठी मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे .
जुन्या आकृत्तीबंधानुसार तलाठी पदांच्या एकुण 3,165 पदे रिक्त आहेत , तर नविन सुधारित आकृत्तीबंधामध्ये काही पदे नव्याने निर्माण करण्यात आल्याने , आता तब्बल 4,200 पदे निर्माण करण्यात येत आहेत .महाराष्ट्र राज्य शासनांकडून जिल्हानिहाय रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे . त्यानुसार पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी राज्य शासनांकडून TCS आणि IBPS कंपनीसोबत करार करण्यात आला आहे .
सविस्तर मेगाभर्ती प्रक्रिया जाहिरात पाहा
शिवाय पेसा क्षेत्रांमधील वर्ग क संवर्गातील पदे हे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार भरण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आला आहे . सध्या राज्यामध्ये 11 जिल्हे पेसा जिल्हे म्हणून अस्तित्वात आहेत , पेसा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आदिवासी प्रवर्गा व्यतिरिक्त इतर प्रवर्गातील उमेदवारांना संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
ज्या पेसा क्षेत्रांमध्ये 50 टक्के पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या आहे अशा ठिकाणी 100 टक्के भरती ही आदिवासी प्रवर्गातीलच उमेदवारांना आरक्षण असणार आहे , तर ज्या क्षेत्रांमध्ये आदिवासी लोकांची वस्ती 25 ते 50 टक्के आहे अशा ठिकाणी 50 टक्के आदिवासी उमेदवारांना आरक्षण राहील तर उर्वरित इतर प्रवर्गातील उमेदवारांना संधी राहील . तर ज्या ठिकाणी 25 टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या पेसा क्षेत्रांमध्ये , 25 टक्के पदे ही आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत .
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !