तलाठी पदांच्या 4,200 जागांसाठी मेगाभरतीस राज्य शासनांकडून अधिक वेगवान हालचाली ! नविन सुधारित अधिसूचना जाहीर !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनांच्या महसुल व वन विभागांध्ये तलाठी पदांच्या संवर्ग क मधील तब्बल 4 हजार 200 पदे मेगाभरती प्रक्रियास राज्य शासनांकडून अधिक वेग आले आहे . महाराष्ट्र राज्य शासनांकडून नविन पदभरती प्रक्रियाबाबत सुधारित शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . या सुधारित शासन परिपत्रकानुसार राज्यांमध्ये वर्ग क संवर्गातील तब्बल 75 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

महाराष्ट्र राज्य महसुल व वन विभागाकडून दि.27.04.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार महसुल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 बाबत  दि.04 05 2023 रोजी मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक , भुमी अभिलेख ( महाराष्ट्र राज्य ) पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झालेली आहे . सदर बैठकीमध्ये परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे , तसेच अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदांची भरती अद्यावत आकडेवारी ,पदभरतीची कार्यपद्धती इ. बाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे .

राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दि.15 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील 75 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करुन 15 ऑगस्ट 2023 पर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त पत्र देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री यांनी सदर भरती शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग अधिकारी पदांसाठी मेगाभर्ती !

राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून सरळसेवा पदभरती प्रक्रिया बाबत जाहीर केलेल्या वेळापत्रक सद्यस्थितीनुसार , तलाठी संवर्गातील ( गट क ) पदे मेगाभरतीबाबत टी.सी.एस या संस्थेमार्फत भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु असल्याचे प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

महाराष्ट्र राज्यातील जिल्हानिहाय रिक्त पदांची आकडेवारी महसूल व वन विभागांकडून जाहीर करण्यात आली असून , जिल्हानुसार त्याचबरोबर विभागांनुसार सुधारित तलाठी रिक्त पदांची संख्या पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

जहिरात पाहा

Leave a Comment