भारतीय स्टेट बँकेत स्पोर्टस कोटा अंतर्गत अधिकारी / लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Sports Quota Recruitment For Officer and clerk Post , Number of Post Vacancy – 68 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अधिकारी ( खेळाडु ) | 17 |
| 02. | लिपिक ( खेळाडु ) | 51 |
| एकुण पदांची संख्या | 68 |
समावेश क्रिडाचे प्रकार : कबड्डी , टेनिस , बॅडमिंटन , क्रिकेट , बास्केटबॉल , फुलबॉल , व्हॉलीबॉल ..
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी , मागील 3 वर्षात आंतर राष्ट्रीय स्पर्धा मध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावेत ..
हे पण वाचा : चित्रपट व दुरदर्शन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : पदवी , संयुक्त विद्यापीठ संघाचा भाग म्हणून राज्य , जिल्हा अथवा विद्यापीठ करीता कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी अथवा आंतर विद्यापीठ कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.04.2024 रोजी SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 10 वर्षाची सुट .
पद क्र.01 साठी : 21-30 वर्षे दरम्यान
पद क्र.02 साठी : 20-28 वर्षे दरम्यान
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.bank.sbi/ या संकेतस्थळावर दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- रुपये तर SC / ST / PWD प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026