महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये शिपाई , परिचर , सेवक , सहाय्यक अशा गट ड संवर्गातील तब्बल 4010 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हतधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Health Department Class D Post Megabharati , Number of Post Vacancy – 4010 ) पदनाम , पदांची संख्या आवकश्य अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : गट ड संवर्गामध्ये शिपाई , कक्षसेवक , बाह्यरुग्ण सेवक , अपघात विभाग सेवक , प्रयोगशाळा परिचर , रक्तपेढी परिचर , दंत सहाय्यक , मदतनिस , अशा पदांच्या 3269 जागा , नियमित क्षेत्र कर्मचारी इतर पदांच्या 183 जागा , नियमित क्षेत्र कर्मचारी ( हंमागी ) पदांच्या 461 , अकुशल कारागीर ( परिवहन ) पदांच्या 80 जागा तर अकुशल कारागीर ( HEMR ) पदांच्या 17 जागा अशा एकुण 4010 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : गट ड / नियमित कर्मचारी ( हंगामी ) संवर्गातील पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर नियमित क्षेत्र कर्मचारी ( इतर ) करीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण तसेच फवारणी डासांच्या कामगार म्हणुन 181 दिवस काम केले असावेत . उर्वरित अकुशल कामगार पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गट क संवर्गातील 6,939 जागेसाठी महाभरती जाहिरात पाहा !
वयोमर्यादा : वरील पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यामध्ये मागास प्रवर्ग / आर्थिकद्ष्ट्या मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 22 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .