बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती  , लगेच करा आवेदन  !

Spread the love

बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BEST Company Mumbai Recruitment For Driver & Condactor Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. .

सदरची पदे हे मुंबई शहरातील प्रतीक्षा नगर , मजास , सांताक्रुझ , धारावी , मुलुंड व वडाळा बस आगारातुन प्रवर्तित होणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक व बस वाहल या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . तसेच सदर उमेदवारांना मराठी येणे अत्यावरश्यक असणार आहेत .

01.बस चालक : बस चालक पदांसाठी उमेदवार हे किमान आठवी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने जारी केलेला प्रवशी अवजड वाहन परवाना व बॅज असणे आवश्यक असणार आहेत . तसेच किमान 1 वर्षांचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लिपीक, शिक्षक, शिपाई, सहाय्यक इ. पदांसाठी थेट पदभरती.

02.बस वाहक : बस वाहक पदांसाठी उमेदवार हे किमान दहावी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवारांकडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://forms.gle/WJ2VvKtEDYAAsTD77 या संकेतस्थळावर अथवा [email protected] या मेलवर दिनांक 20 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment