मुख्य न्याय दंडाधिकारी मुंबई यांच्या न्यायालयांमध्ये सफाईगार / मेहतर पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

मुख्य न्याय दंडाधिकारी मुंबई यांच्या न्यायालयांमध्ये सफाईगार / मेहतर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chief Judical Magistrate Courts Mumbai recruitment for Sweeper Post , number of post vacancy – 07 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सफाईगार / मेहतर पदांच्या एकुण 07 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 4 थी पास उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वेतन : 15000-46600/- ( सातव्या वेतन आयोगानुसार )

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा.प्रबंधक मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय , महापालिका मार्ग एस्लनेड मुंबई 400001 या पत्यावर दिनांक 01.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment