भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रता धारकांसाठी 300 रिक्त जागेवर पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard recruitment for Navik post , Number of post Vacancy – 300 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | नाविक ( GD ) | 260 |
02. | नाविक ( DB ) | 40 |
एकुण पदांची संख्या | 300 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण ( गणित / भौतिकशास्त्र विषयांसह )
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.09.2003 ते दि.31.08.2007 दरम्यान झालेला असावा . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindiancoastguard.cdac.in/या संकेतस्थळावर दिनांक 11.02.2025 पासुन ते दिनांक 25.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !