महाराष्ट्र अग्निशमन सेवा मध्ये फायरमन व अग्नि प्रतिबंध अधिकारी पदांच्या प्रशिक्षण करिता भरती ..

Spread the love

महाराष्ट्र अग्निशमन सेवा मध्ये फायरमन व अग्नि प्रतिबंध अधिकारी पदांकरीता सेवा प्रवेश भरती राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fire service State Fire Training center recruitment for firemen and sub-officer course ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रकोर्सचे नावपदसंख्या
01.फायरमनतुर्तास प्रविष्ठ नाहीत ..
02.उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी40

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तर मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 5 टक्क्यांची सुट असेल .

हे पण वाचा : पॉवर ग्रिड महामंडळ मध्ये विविध पदांच्या 435 जागेसाठी मेगाभरती , Apply Now !

पद क्र.02 साठी : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता गुणांमध्ये 5 टक्क्यांची सुट देण्यात येईल .

शारीरिक पात्रता :

कोर्सचे नाववजनछातीउंची
फायरमन50 कि.ग्रॅम81/86 से.मी165 से.मी
उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी50 कि.ग्रॅम81/86 से.मी165

वयोमर्यादा : दिनांक 15 जुन 2024 रोजी पर्यंत ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट राहील )

फायरमन पदासाठी : किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी पदासाठी : किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी  https://mahafireservice.formsubmit.in या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत आवेदन सादर करायेच आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

प्रशिक्षण भरती माहिती (PDF)

Leave a Comment