MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 235 जागेसाठी सरळसेवा महाभरती !

Spread the love

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 235 जागेसाठी सरळसेवा महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MMRDA Recruitment for various post , number of post vacancy – 235 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक अभियंता श्रेणी – 1 ( स्थापत्य )07
02.सहाय्यक अभियंता ( श्रेणी 1 – रेलपथ )01
03.सहाय्यक अभियंता श्रेणी – 1 ( संकेत व दुरसंचार )01
04.उपनियोजक29
05.सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक04
06.सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 ( स्थापत्य )82
07.सहाय्यक अभियंता ( श्रेणी 2 – रेलपथ )04
08.सहाय्यक अभियंता ( श्रेणी 2 – विद्युत )16
09.सहाय्यक अभियंता ( श्रेणी 2 – संकेत व दुरसंचार )02
10.सहाय्यक समाज विकास अधिकारी07
11.सहाय्यक विधी अधिकारी04
12.उद्यान विद्या सहाय्यक02
13.उप लेखापाल33
14.लघुटंकलेखक10
15.भूमापक31
16.संगणक तंत्रज्ञ02
 एकुण पदांची संख्या235

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 ते 04 साठी : संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी

पद क्र.05 साठी : कोणतीही पदवी , MSCIT

पद क्र.06 ते 09 साठी : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा , अनुभव

पद क्र.10 साठी : एम.एस.डब्ल्यु

पद क्र.11 साठी : विधी पदवी

पद क्र.12 साठी : वनस्पती शास्त्र , कृषी शास्त्र , वनस्पती शास्त्र , उद्यान विद्या शास्त्र / समकक्ष पदवी .

पद क्र.13 साठी : 60 टक्के गुणांसह बी.कॉम , MSCIT

पद क्र.14 साठी : 10 वी उत्तीर्ण , शॉर्टहॅण्ड 80 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग

पद क्र.15 साठी : 10 वी , आयटीआय ( सर्वेक्षक )

पद क्र.16 साठी : 10 वी , संगणक हार्डवेअर व नेटवर्किंगचा 02 वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.18.02.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 20.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment