मुंबई विद्यापीठांमध्ये विविध पदांच्या 298 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई विद्यापीठांमध्ये विविध पदांच्या तब्बल 298 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai University Recruitment For Various post , Number of Post Vacancy – 298 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

जाहीरात क्र.01 ( एकुण 152 जागेसाठी पदभरती ) :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विद्याशाखांचे डीन04
02.प्राध्यापक21
03.सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल54
04.सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल73
 एकुण पदांची संख्या152

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पीएचडी सोबत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण / नेट / सेट / अर्हता ( सविस्तर माहितीसाठी खालील जाहीरात पाहा )

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://muappointment.mu.ac.in/ या संकेतस्थळावर दि.07 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत तर भरलेले अर्ज The registrar university of Mumbai room no,25 fort Mumbai 400032  या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

जाहीरात क्र .02  ( 146 जागेसाठी पदभरती ) :

Ad-hoc शिक्षक पदांच्या 146 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन करायचे आहेत . सदर पदांसाठी जॉब लोकेशन हे सिंधुदुर्ग , रत्नागिरी व कल्याण अशी असणार आहे .

हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांच्या तब्बल 4,305 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पदनाम / पदांची संख्या : Ad-hoc शिक्षक पदांच्या एकुण 146 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी तसेच नेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://muappointment-adhoc.mu.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तर भरलेले अर्ज हे आवक विभाग रुम नं.25 मुंबई विद्यापीठ फोर्ट मुंबई 400032 या पत्यावर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment