राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती मध्ये तब्बल 38,440 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , महाभरती नोटिफिकेशन प्रसिद्ध !

Spread the love

राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती मध्ये तब्बल 38,440 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रकिया राबविण्याबाबत राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती मार्फत पदभरतीची अधिकृत्त जाहीरात नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे .पदनाम , पदांसाठी असणारी आवश्यक पात्रता , वेतनमान या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया नोटिफिकेशन पुढीलप्रमाणे पाहुयात ..

मुख्याध्यापक :  या पदांच्या एकुण 740 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच बी.एड पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच 12 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता 78,800-209200/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत .

पदवीधर शिक्षक : पदवीधर शिक्षक पदांच्या एकुण 8,140 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच संबंधित विषयांमध्ये मास्टर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांस 47,600-151,100/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत .

पदवीधर शिक्षक ( कॉम्पुटर विज्ञान ) पदांच्या एकुण 740 जागा ,कला शिक्षक पदांच्या 740 जागा , शारिरीक शिक्षण शिक्षक पदांच्या एकुण 1480 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक / व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यांमध्ये विविध पदांच्या तब्बल 6,407 पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

ग्रंथपाल : ग्रंथपाल पदांच्या एकुण 740 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवर हे ग्रंथालयीन कामकाज क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे सदर पदांसाठी 44,900-142400/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत .तसेच स्‍टाफ नर्स पदांच्या एकुण 740 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी 29200-92300/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत .

वसतिगृह गृहपाल : गृहपाल पदांच्या एकुण 1480 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांरकीता 29,200-92300/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत .तसेच लेखापाल पदांच्या एकुण 740 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा वाणिज्य शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , सदर पदांसाठी 35,400-112400/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन आहरीत करण्यात येणार आहेत .

शिक्षकेत्तर कर्मचारी / चतुर्थश्रेणी कर्मचारी पदे : तसेच केटरिंग सहाय्यक पदांच्या 740 जागा ,तर चौकीदार पदांच्या 1480 जागा , स्वयंपाकी पदांच्या 740 जागा , वाहनचालक पदांच्या 740 जागा , प्लंबर पदांच्या 740 जागा , माळी पदांच्या 740 जागा ,कनिष्ठ सहाय्यक पदांच्या 1480 जागा ,प्रयोगशाळा परिचर पदांच्या 740 जागा , मेस हेल्पर पदांच्या 1480 जागा ,वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या 740 जागा तर सफाईगार पदांच्या 2220 जागा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर पदांकरीता 19,900-63200/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन आहरित करण्यात येणार आहेत .व सदर पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पदांनुसार अधिक माहीतीसाठी छात्र समितीकडून निर्गमित करण्यात आलेली सविस्तर महाभरती नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

पदभरती नोटिफिकेशन

Leave a Comment