जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं.क.सोसायटी छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं.क.सोसायटी छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM Chhatrapati sambhajinagar Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 55 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी18
02.स्टाफ नर्स18
03.एमपीडब्ल्यु ( पुरुष )19
 एकुण पदांची संख्या55

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक

पद क्र.02  साठी : GNM / BSC नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक ..

हे पण वाचा : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत तब्बल 517 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण तसेच पॅरॉमेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स उत्तीर्ण आवश्यक  ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षे असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा रुग्णालय , छत्रपती संभाजीनगर या पत्यावर दिनांक 29 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .  

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment