NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 279 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 279 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power corporation of india limited recruitment for various Post , Number of Post Vacancy – 279 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॅटेगरी – II – स्टायपेंडरी ट्रेनी ( ST/TN) ऑपरेटर153
02.कॅटेगरी – II – स्टायपेंडरी ट्रेनी ( ST/TN) मेंटेंनर126
 एकुण पदांची संख्या279

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : उमेदार हे 50 टक्के गुणांसह 12 वी ( विज्ञान )उत्तीर्ण आवश्यक ..

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1027 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

पद क्र.02 साठी : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक आहे .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 11.09.2024 रोजी किमान वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तसेच SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 100/- रुपये तर ( SC / ST / माजी सैनिक / अपंग / महिला ) प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment