स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदाच्या तब्बल 8,326 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission Recruitment for MTS & Havaldar post Number of Post Vacancy – 8326 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) | 4887 |
02. | हवालदार | 3439 |
एकुण पदांची संख्या | 8326 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी पर्यत … ( SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल . )
पद क्र.01 साठी : किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र. 02 साठी : किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलांमध्ये 112 जागेसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- महाराष्ट्र राज्यात आयुध निर्माणी भंडारा येथे 334 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- पंजाब नॅशनल बँकेत 2700 आत्ताची मोठी महभरती , लगेच करा आवेदन !
- देशातील ग्रामीण बँक मध्ये तब्बल 9500+ जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास मुदतवाढ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा मध्ये फायरमन व अग्नि प्रतिबंध अधिकारी पदांच्या प्रशिक्षण करिता भरती ..