UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती

Spread the love

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) मार्फत Administrative Officer (Scale-I) पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Generalist आणि Hindi Officer या दोन प्रकारच्या पदांचा समावेश असून एकूण 225 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदाचे नाव व पदसंख्या

क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 Administrative Officer (Scale-I) – Generalist 200 2 Administrative Officer (Scale-I) – Hindi Officer 25 एकूण225

शैक्षणिक पात्रता

Generalist: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. सर्वसाधारण उमेदवारांसाठी किमान 60% गुण, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 55% गुणांची अट आहे.

Hindi Officer: जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेनुसार हिंदी व इंग्रजी विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. पात्रतेच्या सविस्तर अटी अधिकृत जाहिरातीत तपासाव्यात.

वयोमर्यादा

दि. 30 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. शासनाच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना वयामध्ये सवलत लागू आहे.

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू : 08 सप्टेंबर 2026
अर्जाची अंतिम तारीख : 28 सप्टेंबर 2026

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रामुख्याने पुढील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे:

  1. पूर्व परीक्षा (Tier-I)
  2. मुख्य परीक्षा (Tier-II)
  3. वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Test)
  4. मुलाखत

पूर्व परीक्षेची संभाव्य तारीख 22 ऑक्टोबर 2026, तर मुख्य परीक्षेची संभाव्य तारीख 30 नोव्हेंबर 2026 अशी नमूद करण्यात आली आहे.

वेतन

Administrative Officer (Scale-I) पदासाठी मूलभूत वेतनश्रेणी ₹82,485 पासून सुरू होते. महानगरातील अंदाजे एकूण मासिक वेतन सुमारे ₹1.10 लाख असू शकते. याशिवाय कंपनीच्या नियमानुसार विविध भत्ते व इतर सुविधा लागू होतात.

नोकरीचे ठिकाण

नियुक्ती भारतामध्ये कुठेही होऊ शकते. जाहिरातीनुसार रिक्त पदांचा मोठा भाग पश्चिम व दक्षिण विभागांमध्ये आहे.

अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS : ₹1,000/-
  • SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Women : ₹250/-

महत्त्वाची सूचना

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी UIIC ची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, परीक्षा पद्धती आणि इतर अटी तपासाव्यात.

अर्जाची अंतिम तारीख : 28 सप्टेंबर 2026

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Apply Now

अधिकृत संकेतस्थळ : UIIC

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment