जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा अंतर्गत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Bhandara District Central Co-operative Bank ltd . recruitment for clerk & peon post , Number of post vacancy – 118 )
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या 99 जागा तर शिपाई पदांच्या 19 जागा अशा एकुण 118 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 99 |
| 02. | शिपाई | 19 |
| एकुण पदांची संख्या | 118 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 23 जुलै 2024 रोजी वयोमर्यादा ..
पद क्र.01 साठी : 21-40 वर्षे दरम्यान
पद क्र.02 साठी : 18 – 40 वर्षे दरम्यान
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://bhandaradccb.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग 850/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 767/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !