JCI : ज्युट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अकाउंटंट , कनिष्ठ सहाय्यक / निरीक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Jute Corporation of india Ltd . Recruitment for various Post , Number of POst Vacancy – 90 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अकाउंटंट | 23 |
| 02. | कनिष्ठ सहाय्यक | 25 |
| 03. | कनिष्ठ निरीक्षक | 42 |
| एकुण पदांची संख्या | 90 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : एम कॉम , 05 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव अथवा बी.कॉम + 07 वर्षांचा अनुभव ..
पद क्र.02 साठी : पदवी उत्तीर्ण , एमएस वर्ड व एक्सेल ज्ञान , इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण ..
पद क्र.03 साठी : 12 वी उत्तीर्ण , अनुभव असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट दिली जाईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.jutecorp.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026