RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Reserve Bank of India Recruitment for Junior Engineer Post , Number of post vacancy -11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता ( सिव्हील ) | 07 |
| 02. | कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) | 04 |
| एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे 65 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता 5 टक्के सुट मिळेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.12.2024 रोजी किमान वय हे 20 तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट मिळेल .
हे पण वाचा : भारतीय रेल्वेत गट ड संवर्गातील तब्बल 32000 रिक्त जागांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 450/- रुपये + 18 टक्के GST रक्कम परीक्षा शुल्क आकारली जाईल . तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 50 रुपये + 18 टक्के GST रक्कम परीक्षा शुल्क म्हणून स्वीकारली जाईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !