CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत तब्बल 1124 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत तब्बल 1124 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central industrial security force recruitment for constable post , number of post vacancy – 1124 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉन्स्टेबल / चालक845
02.कॉन्स्टेबल ( चालक कम पंप ऑपरेटर )279
 एकुण पदांची संख्या1124

आवश्यक अर्हता : उमेदार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच अवजड / हलके वाहन चालविण्याचा परवाना धारक असावेत .

हे पण वाचा : युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( age Limit ) : दिनांक 04.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cisfrectt.cisf.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 03.02.2025 पासुन ते दिनांक 04.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment