शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !

Spread the love

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government medical college & hospital nanded recruitment for class D post , number of post vacancy – 79 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वर्ग – 4 ( गड – ड ) संवर्गातील पदे79
02.प्रयोगशाळा परिचर ( वर्ग – 4 )17
 एकुण पदांची संख्या86

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तर यांमधील स्वच्छक या पदाकरीता उमेदवार हे 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ;

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 24.04.2025 रोजी उमदेवाराचे वय हे 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/  या संकेतस्थळावर दिनांक 16.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता  खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment