युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Bank of india Recruitment for manager post , number of post vacancy -500 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक ( Credit ) | 250 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक ( आयटी ) | 250 |
| एकुण पदांची संख्या | 500 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , CA / CS / CMA अथवा 60 टक्के गुणांसह एमबीए / एमएमएस / PDBM / PGDM
पद क्र.02 साठी : बी.ई / बी.टेक / एमसीए
हे पण वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ;
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 22-30 वर्षे वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .यांमध्ये जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 177/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026