DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांच्या 148 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Defence research & Development Organisation recruitment for various post , number of post vacancy – 148 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांचीं संख्या |
| 01. | सायंटिस्ट ( B – DRDO ) | 127 |
| 02. | सायंटिस्ट / अभियंता ( B – ADA ) | 09 |
| 03. | सायंटिस्ट B | 12 |
| एकुण पदांची संख्या | 148 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे प्रथम श्रेणी बी.ई / बी.टेक ( संबंधित विषयांमध्ये ) पदवी अथवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण , गेट परीक्षा उत्तीर्ण .
हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे कमाल वय हे 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rac.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे ( अर्ज सुरु होण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल . ) सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !