महाराष्ट्र राज्य महसुल विभाग अंतर्गत तलाठी पदांच्या 4112 जागेसाठी पदभरती प्रक्रियेबाबत महसुल व वन विभागांकडुन पदभरती प्रक्रिया अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे .या संदर्भातील महसुल व वन विभागाकडुन निर्गमित करण्यात आलेली पदभरतीची अधिसुचना पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्य महसुल विभागामधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील तलाठी वर्ग – क संवर्गाची दि.31.12.2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 1012 त्याचबरोबर दि.07.12.2022 च्या शासन निर्णयान्वये तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 असे एकुण 4,122 जागेसाठी पदभरती प्रक्रियेस राज्य शासनाकडुन मान्यता देण्यात आली आहे .
सदर तलाठी पदभरती प्रक्रिया वित्त विभागाच्या संदर्भ दि.31.10.2022 च्या निर्णयनुसार सरळसेवा कोट्यामधील रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास मुफा देण्यात आलेली आहे .सदरची तलाठी पदांकरीता महाभरती प्रक्रिया जानेवारी 2023 च्या शेवटच्या आठवडयात भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरीता संबंधित स्पर्धा परीक्षा घेण्याऱ्या कंपनीना सुचित करण्यात आलेले आहेत .तसेच सदर पदांची जिल्हानिहाय रिक्त जागांची संख्या बाबतची भरती जाहीरात लवकरच महसुल विभागाकडुन प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
पात्रता / वेतनश्रेणी – तलाठी पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमदेवार हा MSCIT / CCC संगणक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तलाठी पदाकरीता सातव्या वेतन आयोगानुसार 25500/- ते 81800 या वेतनश्रेणीमध्ये वेतन मिळते .
अधिक माहीतीसाठी महसुल व वन विभागाडुन प्रसिद्ध करण्यात आलेली सविस्तर पदभरती अधिकसुचना डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !