सरकारने केले Fix :  कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या वेतन / पेन्शनसोबत , मिळणार जुलै पासुन वाढीव DA व महागाई भत्ता फरक !

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची ब्रेकिंग न्युज समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जुलै पासुन थकित महागाई भत्ताचा वाढीबाबत राज्य शासनाकडुन जानेवारी 2023 मध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे . याकरीता आवश्यक निधींची तरतुद देखिल राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के महागाई भत्ता माहे जुलै 2022 पासुन अपेक्षित असून , सदर वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुनच लागु करण्यात येणार असून , जानेवारी महीन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्याकरीता आवश्यक निधींची तरतुद करण्यात येणार आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार डी.ए वाढ बाबत अशी तरतुद करण्यात आलेली आहे कि , केद्र सरकारने लागु करण्यात आलेला वाढीव डी.ए दर त्या त्या कालावधीकरीता लागु राहतील . या तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु होईल . राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना डी.ए फरकासह वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत विभागनिहाय निधींची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे .

जानेवारी 2023 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकुण 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ फरकासह लागु करण्यात येणार आहे . यामुळे केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

Leave a Comment