LIC Super Pension Scheme : एलआयसीच्या अंतर्गत प्रधानमंत्री वय वंदना योजने च्या माध्यमातून पेन्शन योजनेचा लाभ घेण्याकरिता केंद्र सरकारने 26 मे 2020 रोजी काही सूचना जाहीर केल्या होत्या. त्याप्रमाणेच या योजनेच्या माध्यमातून विवाहित जोडप्यांना सुरक्षितपणे प्रति महिना पेन्शन मिळू शकते.
ही योजना आता भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत म्हणजेच एलआयसीच्या अंतर्गत राबवली जात असून जे कोणी विवाहित जोडपे असतील त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. विवाहित जोडपे ज्यावेळी साठ वर्षाचे होईल त्यावेळी या योजनेचा लाभते घेऊ शकतील. पुढे दिलेल्या माहितीप्रमाणे त्या जोडप्यांना प्रति महिना अठरा हजार रुपये इतकी पेन्शन मिळू शकते.
LIC सुपर पेन्शन योजनेच्या माध्यमातून दरमहा 18,500 रुपये पेन्शन मिळेल!
विवाहित जोडपे ज्यावेळी त्यांचे साठ वर्षे पूर्ण होतील त्यानंतर प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतील आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची ते गुंतवणूक करू शकणार आहेत.
यापूर्वी एखाद्या व्यक्तीने या योजनेमध्ये जास्तीत जास्त साडेसात लाख रुपयांचे गुंतवणूक करता येत होती पण, त्यामध्ये सरकारने वाढ केली असून साठ वर्षावरील विवाहित जोडप्यांना या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक योजनांच्या तुलनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत जास्त व्याज दिले जाते.
दरमहा 18 हजार रुपये पेन्शन मिळविण्याकरिता पती किंवा पत्नी दोघांनाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये जवळपास 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असून जोडप्याने गुंतवणूक केलेली रक्कम ही तीस लाख रुपये असणार आहे. या योजनेवर जोडप्याला वार्षिक दोन लाख 22 हजार रुपये आणि 7.40% व्याजदर मिळेल.
तुम्ही जर 2,22,000 रुपयांना बारा मी भागले तर मासिक 18,500 रुपये रक्कम आपल्याला मिळते या योजनेमध्ये फक्त एका व्यक्तीने 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीला प्रति महिना नऊ हजार रुपयांची पेन्शन सुरू होईल. विशेष म्हणजे ही योजना शासनाच्या माध्यमातून दहा वर्षापर्यंत राबविण्यात आली आहे.
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !