तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साझे व महसूल मंडळाकरीता पदनिर्मिती करणेबाबतचा राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या नविन निर्णयानुसार तलाठी पदभरती नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत .
नविन नियमांनुसार तलाठी हे पद ग्रामीण पातळीवर प्रशासकीय अधिकारी असणार आहे , यामुळे तलाठी पदांचे नामकरण देखिल करण्यात येणार आहे . जेणेकरुन ग्रामीण पातळीवरच्या समस्या ग्रामीण पातळीवरच सोडविले जाणार आहेत .यानुसार आता तलाठी पदांकरीता नविन नियमानुसार पदभरती करण्यात येणार आहे .राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार राज्यात 3110 तलाठी पदे रिक्त आहेत तर मंडळ अधिकारी पदांच्या एकुण 518 जागा रिक्त आहेत .
रिक्त पदे व नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अशा एकूण 4122 जागांसाठी पदभरती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे .मंडळ अधिकारी पदांचे काही पदे हे पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत , तर काही पदे हे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत .
नविन नियमांनुसार आता तलाठी पदांकरीता आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरतीय करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे . तसेच नविन नियमांनुसार आता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . तर कोरोना काळांमुळे वयांमध्ये आणखीण शिथिलता देण्याचा विचार राज्य सरकारडून करण्यात येत आहेत .
त्याचबरोबर सदर पदभरती करीता उमेदवार हा पदवीधारक असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हताची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे . यापुर्वी काही शैक्षणिक अर्हतांना मान्यता देण्यात आलेली नव्हती , परंतु आता नविन नियमांनूसार काही समकक्ष शैक्षणिक अर्हतांना मान्यता देण्यात आलेली आहे .
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !