बस महामंडळाकडून राज्यातील 29 समाज घटाकांना प्रवास भाड्यांमध्ये मोठी सवलत देण्यात येते . यामध्ये दिव्यांग ,प्रज्ञाचक्षू , विविध राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त नागरकि , शालेय विद्यार्थी , ज्येष्ठ नागरकि अशा विविध राज्य प्रकारच्या 29 समाज घटकांतील प्रवासांना बस महामंडळाकडून प्रवास सवलत देण्यात येते .या प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे .
स्मार्ट कार्डसाठी 31 मार्च पर्यंत मुदवाढ – राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या दरातमध्ये प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड धारकांना मार्च 2023 पर्यंत मुदवाढ देण्यात आलेली आहे .सदर स्मार्ट कार्डची मुदत ही 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत होती . सदर मुदतवाढीमुळे राज्यातील प्रवास सवलत घेणाऱ्या नागरकिांना मोठा फायदा झालेला आहे .
स्मार्ट कार्ड कसे काढावे – वरील नमुद पात्र नागरिकांना प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आपल्या जवळच्या आगार कार्यालयाशी भेट देवून , काढू शकता . याकरीता आपल्याकडे आधारकार्ड / मतदानकार्ड असणे आवश्यक आहे .किंवा ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे .
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना – भारताला स्वातंत्र्य होवून 75 वर्षे पुर्ण झाल्याने , राज्यातील 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना मोफत बस प्रवास सेवा देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .याकरीता ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डची आवश्यकता नाही याकरीता नागरिकांकडे आधार कार्ड , मतदानकार्ड / बँकपासबुक असणे आवश्यक आहे .
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !