केंद्रशासन सेवेच्या अधिनस्त संवर्ग ब व क पदांच्या तब्बल एक लाख तीस हजार जागेसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
यामध्ये संवर्ग ब मध्ये सहाय्यक खाते ,अधिकारी सहाय्यक, ऑडिट अधिकारी , सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक सेक्शन अधिकारी , आयकर इन्स्पेक्टर, उपनिरीक्षक निरीक्षक, एक्झिक्यूटिव्ह सहाय्यक ,संशोधन सहाय्यक, डीविजनल खाते अधिकारी , सब इन्स्पेक्टर ,कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदांकरिता उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .
तर संवर्ग “क” मध्ये ऑडिटर ,अकाउंटंट ,पोस्टल साहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक ,वरिष्ठ लिपिक ,वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक ,कर सहाय्यक, उपनिरीक्षक अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरिता उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / फीस : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन ऑनलाइन पद्धतीने https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 3 मे 2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करिता उमेदवाराकडून ₹ 100/- रुपये आवेदन शुल्क तर , मागासवर्गीय / माजी सैनिक/ महिला उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026