मागील सुमारे 06 महिन्यांपासून चर्चेचा विषय असणारा तलाठी पदभरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे .राज्य शासनांचे महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाठी पदभरती नियमावलीमध्ये बदल करण्यात आल्याने , पदभरतीस वेग आला आहे .
तलाठी पदभरती मधील नविन बदल – तलाठी पदभरती प्रक्रिया मध्ये पेसा अंतर्गत होणारी पदभरती मध्ये बदल करण्यात आलेला असून , यापूर्वी पेसा अतंर्गत केवळ अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात येत होती . परंतु आता लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्यात येणार आहेत .यानुसार राज्यातील 11 पेसा जिल्हामधील उमेदवारांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तलाठी पदांच्या पदे वाटप करण्यात करण्यात येणार आहेत .
ज्या पेसा क्षेत्रांमध्ये 50 टक्के पेक्षा अधिक अनुसुचित प्रवर्गातील लोक वास्तव्यास आहेत , अशा ठिकाणी 100 टक्के अनुसुचित प्रवर्गातूनच पदभरती करण्यात येणार आहे . तर ज्या पेसा क्षेत्रांमध्ये 25 टक्के ते 50 टक्के दरम्यान लोकसंख्या आहे अशा ठिकाणी 50 टक्के अनुसुचित क्षेत्रातुन तर उर्वरित 50 टक्के तेथील वास्तव्यास असणाऱ्या लोकांच्या प्रमाणानुसार इतर प्रवर्गातून पदे भरण्यात येणार आहेत .
ज्या भागांमध्ये अनुसुचित जमाती प्रवर्गातील लोकांची 25 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा पेसा क्षेत्रांमध्ये , 25 टक्के पदे अनुसुचित जमाती प्रवर्गातुन तर उर्वरित जागा अनुसूचित जाती , इतर मागास प्रवर्ग व इतर घटकांमधून भरण्यात येणार आहेत .
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांकडून दि.12.04.2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्य शासन सेवेत 75 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पुर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !