शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivaji University Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 175 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकुण 149 जागा , सहयोगी प्राध्यापक पदांच्या 10 जागा , कंठसंगित साथीदार पदांच्या 01 जागा , तबला साथीदार पदांच्या 02 जागा , हार्मोनियम साथीदार पदांच्या 02 जागा , नाट्यशास्त्र साथीदार पदांच्या 02 जागा , पीएलसी साथीदार पदांच्या 01 जागा , कत्थक साथीदार पदांच्या 01 जागा , भरतनाट्यम साथीदार पदांच्या 01 जागा , टेक्निशियन ( संगित व नाट्यशास्त्र ) पदांच्या 02 जागा , समन्वयक पदांच्या 04 जागा अशा एकुण 175 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : यांमध्ये प्राध्यापक पदांसाठी उमेदवार हे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी , SET / NET अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच इतर पदांकरीता पदांनुसार आवश्यक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने http://sukapps.unishivaji.ac.in/establishment या संकेतस्थळावर दि.24 जून 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !