Institute of Banking Personeel Selection : IBPS मार्फत बँकिंग लिपिक या पदांच्या तब्बल 4 हजार 45 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व संगणक अर्हता धारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन विहीत कालावधी मागविण्यात येत आहेत . ( IBPS Clerk Recruitment Number of Post Vacancy – 4045 + ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | लिपिक | 4045+ |
आवश्यक शैक्षणिक / संगणक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच संगणक ऑपरेटींग प्रणालीमध्ये संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे किंवा शाळा / महाविद्यालय / कॉलेज संस्थामधील एक विषय संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : राज्यात 6,000+ जागेसाठी मेगभर्ती 2023
वयोमर्यादा – सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमला वयोमर्यादा 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये अनुसुचित जाती / जमाती प्रवार्गातील उमेदवारांसाठी वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज हा https://ibpsonline.ibps.in/crpcl13jun23/ या संकेतस्थळावर दिनांक 21 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर भरती करीता General / OBC करीता 850/- तर मागास / माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरीता 175/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येणार आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्यात नागपुर , अमरावती , अकोला , वर्धा या जिल्ह्यात शिक्षक पदांच्या 105 जागेसाठी पदभरती …
- लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नी अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 जागेसाठी महाभरती ; Apply Now !