चिखली नागरी सहकारी बँकेमध्ये , बुलढाणा येथे अधिकारी ,समन्वयक , शिपाई , वाहनचालक , सुरक्षा रक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chikhali Urban co-operative limited recruitment for various Post , Number of Post Vacancy – 42 )
यांमध्ये कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकुण 20 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे तसेच उमेदवाराचे किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
सोशल मिडीया समन्वयक : सोशल मिडिया समन्वयक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा पत्रकारिता पदवीधर किंवा पदव्युत्तर अथवा संबंधित क्षेत्रांमध्ये अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वसुली सहाय्यक शिपाई / वाहनचालक : वसुली सहाय्यक शिपाई / वाहनचालक पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा किमान 10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
सुरक्षा रक्षक : सुरक्षा रक्षक पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 10 वी / माजी सैनिक / बी.एस.एफ / सी.आर.पी.एफ मधून सेवानिवृत्त जवांनाना प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज मुख्य कार्यालय दि.चिखली नागरी सहकारी बँक लि.चिखली बुलढाणा या पत्त्यावर दिनांक 22 जुलै 2023 पर्यंत आवेदन सादर करावा .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !