MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 378 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 378 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 378 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.प्राध्यापक : प्राध्यापक पदांच्या 32 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे Ph. D, SCI सर्जन / UGC / AICTC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.सहयोगी प्राध्यापक : सहयोगी प्राध्यापक पदांच्या 46 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे Ph.D तसेच 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी तसेच SCI सर्जन / UGC / AICTC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : BHC : मुंबई उच्च न्यायालय मध्ये आत्ताची नविन पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

03.ग्रंथपाल / शारिरीक शिक्षण संचालक : सदर पदांकरीता उमेदवार हे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी / शारीरिक शिक्षण आणि क्रिडा विज्ञान किंवा लायब्ररी सायन्स , इन्फॉर्मेशन विज्ञान अथवा डॉक्युमेंटेशन विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी तसेच नेट / सेट उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

04.अधिव्याख्याता : अधिव्याख्याता पदांच्या 86 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच BED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . यांमध्ये पद क्र 01 व 02 करीता 719/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / आदुघ / दिव्यांग / अनाथ प्रवर्ग करीता 449/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत . तर पद क्र.03 व 04 करीता 394/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / आदुघ / दिव्यांग / अनाथ प्रवर्ग करीता 294/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment