उच्च न्यायालय मंबई न्यायालयाच्या मुळ शाखा आस्थापनेवर सफाई कामगार पदांची रिक्त असणाऱ्या पदांकरीता निवड यादी तयार करण्यासाठी निरोगी , इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदरची निवड यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासुन फक्त 02 वर्षांसाठी वैध राहील सातव्या वेतन आयोगानुसार सदर पदाचे वेतन मॅट्रिक्स S-1 मध्ये वेतनस्तर 15,000/- ते 47,600/- व इतर अनुज्ञेय वेतन व भत्ते लागु राहतील .
पदासाठी आवश्यक पात्रता –
अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा , झाडु कामाचा तसेच कार्यालय परीसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे .तसेच जाहीरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासुन खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता किमान वयोमर्यादा 21 वर्षे असणे आवश्यक आहे . तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असणे आवश्यक आहे .मागासवर्गीय उमेदवारांकरीता किमान वयोमर्यादा 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 43 वर्षे असणार आहे .
सफाई कामगार पदांच्या 02 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , नियुक्ती व अल्पसुचीचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांनी स्वत : कडे राखून ठैवले आहेत .अर्ज सादर करणार उमेदवार नैतिक पतनाच्या गुन्हासाठी ठरवण्यात आले नसावे किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षा उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे / अपात्र ठरवले नसावे .
निवड पद्धती
सदर पदांकरीता एकुण 50 गुणांची मुल्यांकन पद्धतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 30 गुण देण्यात येईल .शारिरीक क्षमता चाचणी करीता 10 गुण तर वैयक्तिक मुलाखतीकरीता 10 गुण असे एकुण 50 गुणांची मूल्यांकन परीक्षा घेण्यात येणार आहे .
जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांने दि.21.10.2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .पद भरतीबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !