महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये 11,443 जागेसाठी मोठी महाभरती राबविण्यात येणार आहे .पोलिस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100 टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधुन सुट मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडुन दि.14.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य पोलिस शिपाई संवर्गामध्ये 11,443 जागेसाठी पदभरती करण्यासास मंजुरी देण्यात आली आहे .
सन 2021 मध्ये पोलिस शिपाई व पोलिस शिपाई चालक व सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गामध्ये 11,443 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत .सदर रिक्त पदांपैकी 100% रिक्त पदे भरण्याकरीता वित्त विभागाची मंजुरी मिळाली आहे .महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलामधील पोलिस शिपाई , गट – क संवर्गातील सन 2021 या वर्षाकरीता विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलिस शिपाई / पोलिस चालक / सशस्त्र पोलिस शिपाई या संवर्गातील एकुण 11,443 पदे 100 टक्के भरण्यास वित्त विभागाच्या दि.12.04.2022 मधील तरतुदींमधून सूट देण्यात आल्याने ,100 टक्के पदे भरण्याची मंजुरी मिळाली आहे .
त्याचबरोबर सदर निर्णयान्वये कोणतीही नविन पद निर्मिती अपेक्षित नसुन केवळ मंजुर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरण्यात येणार आहेत .यामध्ये पोलिस शिपाई , पोलिस शिपाई चालक , तसेच सशस्त्र पोलिस शिपाई एकुण रिक्त जागा मिळुन 11,443 जागेसाठी लवकरच पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे .सदर निर्णयाच्या अनुषंगाने पदभरतीची जाहीरात लवकरच निघेल .यामुळे पोलिस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना आपली तयारी अधिक जोमाने सुरु करावी लागेल .
शिवाय सर्वांनी आपले कागतपत्रे परिपुर्ण करणे आवश्यक आहे , जसे कि जात प्रमाणपत्र , नॉन क्रिमेलियर , रहिवाशी दाखला , आधार अपडेट इत्यादी . पोलिस शिपाई भरती संदर्भातील गृह विभागाचा दि.14.10.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
सरकारी भरती व योजनाच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !