केंद्र शासन सेवेत इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 26,146 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 26,146 ) महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | BSF | 6,174 |
| 02. | CISF | 11,025 |
| 03. | CRPF | 3,337 |
| 04. | SSB | 665 |
| 05. | ITBP | 3,189 |
| 06. | AR | 1490 |
| 07. | SSF | 296 |
| एकुण पदांची संख्या | 26,146 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : राज्य शासन सेवेत सरळसेवा पद्घतीने गट क संवर्गातील 345 जागांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर राखीव प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026