कल्याण डोंबिवली व मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी आरोग्य अभियानासाठी विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर पदभरती निव्वळ कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदभरती बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
मिरा भाईंदर महानगरपालिकेसाठी
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 4 |
| 02. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 6 |
| 03. | स्टाफ नर्स | 11 |
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 27 |
| 02. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12 |
| 03. | स्टाफ नर्स | 40 |
पात्रता / वेतनमान – वैद्यकिय अधिकारी पदांसाठी MBBS पात्रता असणे आवश्यक . प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.SC With DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर स्टाफ नर्स पदासाठी B.SC NURSING / GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .वैद्यकिय अधिकारी पदासाठी 60,000/- रुपये प्रतिमहा मानधन दिले जाईल , तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी 17,000/- रुपये मानधन देण्यात येईल तर स्टाफ नर्स पदाकरीता 20,000/- रुपये मानधन अदा करण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – वरील नमुद शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांने आपला अर्ज दि.3.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदांकरीता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता 150/- रुपये आवेदन शुल्क तर मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क म्हणुन स्विकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .