महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये पहिल्या टप्यामध्ये तब्बल 75,000 जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे . या संदर्भात काल दि.20 ऑक्टोंबर 2022 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे . उमेदवारांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारकडुन महाभरीक्षा पोर्टल चालु करण्यात आले होते . परंतु सदर पोर्टल मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने तसेच उमेदवारांनी या पोर्टलचा विरोध केल्याने सदर भरती पोर्टल राज्य सरकारकडुन रद्द करण्यात आले आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील अराजपत्रित पदे , गट क व गट ड संवर्गाती पदे भरण्यासाठी टीसीएस व आयबीपीएस मार्फत परीक्षा घेण्यात येणार असल्याने , राज्य सरकारमध्ये 75 हजार रिक्त जागा भरण्याचा मार्ग सुकर झालेला आहे .सदरची पदभरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असुन , भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे .सदर पदभरती प्रक्रिया ही सरळसेवा पद्धतीने राबविली जाणार असुन राज्यातील लिपिक संवर्गातील पदे भरण्यासाठी यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार , महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येईल .
पदभरती बाबतच्या निवड झाल्यानंतर परीक्षांची कार्यपद्धती व इतर अटी व शर्ती राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत निश्चित करण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील सुशिक्षित बेराजगार तरुणांना राज्य शासन सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे .राज्याातील पदभरत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे .
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !