भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या तब्बल 490 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airport Authority of India , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 490 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ कार्यकारी ( आर्किटेक्चर | 03 |
| 02. | कनिष्ठ कार्यकारी ( स्थापत्य ) | 90 |
| 03. | कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रिकल ) | 106 |
| 04. | कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक्स) | 278 |
| 05. | कनिष्ठ कार्यकारी ( आयटी ) | 13 |
| एकुण पदांची संख्या | 490 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ;
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी , गेट 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती 2024
पद क्र.02 ते 05 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयातील बी . ई / बी . टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच गेट 2024 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 मे 2024 रोजी कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावर दिनांक 02.04.2024 पासून ते दिनांक 01.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .यांमध्ये खुला प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग व महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026