बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिपाई / सफाईगार पदांच्या तब्बल 7,830 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , फक्त दहावी पात्रताधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत . सविस्तर पदभरती , आवश्यक पात्रता याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 1320 शिपाई , सफाईगार , चौकीदार , सफाई कर्मचारी , माळी इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती . परंतु त्यानंतर पालिका प्रशासनांमध्ये वर्ग चार संवर्गात आत्तापर्यंत मोठी भरती न राबविल्याने , रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे .शिवाय वाढत्या लोकसंख्येनुसार काही पदे वाढीव मंजुर करण्यात येणार आहेत .
सध्या पालिका प्रशासनांमध्ये शिपाई , माळी ,पहारेकरी ,स्मशान पहारेकरी / कर्मचारी ,सफाई कर्मचारी त्याचबरोबर पालिका प्रशासनातील विविध विभागातील संवर्ग 4 मधील रिक्त पदांवर पालिका प्रशासनांकडून लवकरच पदभरती करण्यात येणार आहे .
आवश्यक पात्रता – सदर पदांकरीता उमदेवार हा मान्यताप्राप्त बोर्डातुन इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे किमान शारीरिक वजन 50 कि.ग्रॅम असणे आवश्यक आहे .
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !