राज्यामध्ये दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून महत्वपुर्ण शासन निर्णय दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.14.02.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात …
दहावी / बारावी परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे , याकरीता काही कडक नियमावली राज्य शासनाकडून शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .आता संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रावर चित्रिकरण करण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत .
50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास मनाई असणार आहे .तसेच अतिसंवेदनशील , संवेदनशील / सर्वसाधारण असे परीक्षा केंद्राचे वर्गीकरण करण्यात येणार आहेत .त्याचबरोबर 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
100 टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घेण्यात येणार आहे , पोलीस पाटील , कोतवाल , शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी करण्यात येणार आहे , तर अंगणवाडी सेविका , मदतनीस , शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
परीक्षेवळी महसूल विभागाचे बैठे पथके नेमण्यात येणार आहेत , संवेदनशील परीक्षा केंद्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे .तसेच प्रत्येक तालुक्यासाठी एक भरारी पथक नेमण्यात येणार आहे .अचानक तपासणीसाठी पोलिसांची उपस्थिती , झडती ,बैठे पथक नेमण्यात येणार आहेत .
तसेच जिल्हाधिकारी , पोलिस अधिक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दौरे नेमण्यात येणार आहेत .इंग्रजी , गणित आणि विज्ञान पेपरसाठी दिवस राखीव ठेवण्यात येणार आहेत .
यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !