आता तरी अर्ज करायला विसरू नका : MPSC मार्फत वर्ग ब व क पदांच्या 8,000+ जागेवर मेगाभर्ती 2023

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य शासन सेवेत वर्ग ब वर्ग क पदांच्या 8169 जागेसाठी मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवाराकडून यापूर्वीच अर्ज प्रक्रिया राबण्यात येत येत होती .परंतु काल दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज करण्याची शेवटची दिनांक होती , यामध्ये आता मुदतवाढ देऊन दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया .

पदांची नावे – सहाय्यक कक्ष अधिकारी , राज्य कर निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक , दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक , दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क , तांत्रिक सहाय्यक , कर सहाय्यक , लिपिक टंकलेखक

एकूण पदांची संख्या – 8169

पात्रता – वरील सर्व पदांसाठी उमेदवार पदवीधारक असणे आवश्यक आहे कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदासाठी मराठी टंकलेखन 30 श. प्र.मि व इंग्रजी 40 श. प्र.मि प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

आवेदन शुल्क – खुला प्रवर्गासाठी 394 रुपये तर मागासवर्गीय त्याचबरोबर अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवाराकडून 294 रुपये आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येईल

अर्ज प्रक्रिया – जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने एमपीएससी पोर्टलवर सादर करायचा आहे यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment