बक्षी समिती खंड – 2 अहवालामध्ये मोठा घोळ ! निवडक संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी , इतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय !

Spread the love

बक्षी समिती खंड दोन मध्ये विशिष्ट संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे . इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे .समान पद असून देखील काही विशिष्ट विभागातीलच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन बक्षी समिती खंड दोन अहवाला नुसार लागू करण्यात आला आहे . यामुळे बक्षी समिती खंड दोन अहवालावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे .

ज्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी होत्या असे अनेक कर्मचारी अद्याप सुधारित वेतनापासून वंचित आहेत . काही विशिष्ट व निवडक संवर्गातीलच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू केले आहेत . बक्षी समिती खंड दोन नुसार ज्या पदांना सुधारित वेतन लागू केले आहेत . अशा इतर विभागातील समान पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करणे आवश्यक होते , परंतु बक्षी समिती खंड दोन नुसार अशा समान पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू न केल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे . असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे .

त्याचबरोबर एकाकी पदांचा बक्षी समिती खंड दोन मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारित वेतनश्रेणी लागू न केल्याने एकाकी पदांतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करत आहेत . कारण सातवा वेतन आयोगानुसार एकाकी पदांच्या वेतनश्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणात वेतन त्रुटी आढळून देखील बक्षी समिती खंड 2 मध्ये एकाकी पदांचा विचार केला गेला नाही .

यामध्ये केवळ वर्ग अ / ब व S -8 पेक्षा अधिक वेतन असणाऱ्या वर्ग क मधील 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे .यामध्ये ज्या पदांच्या वेतनश्रेणीमध्ये खऱ्याच त्रुट्या होत्या , अशा पदांचा विचार बक्षी समिती खंड 2 मध्ये करण्यात आलेला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment