New Post Office Plan : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा इतक्या महिन्यातच होतील पैसे दुप्पट ! गुंतवणुकीसाठी FD पेक्षा चांगला पर्याय !

Spread the love

New Post Office Plan : देशभरामध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना लोकांसाठी राबवल्या जात असून नागरिक देखील त्या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक बाजू बळकट करत आहेत. विशेष म्हणजे कित्येक नागरिक आता पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या भविष्याचे नियोजन आतापासूनच सुरू करत आहेत. तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून खात्रीशीर परतावा मिळवण्यास इच्छुक असाल तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेविषयी माहिती घेऊया ज्या माध्यमातून सर्वोत्तम असा व्याजदर नागरिकांना मिळत आहे.

पोस्ट ऑफिस ने देशभरातील लहान ठेवीदारांसाठी काही विशेष योजना राबवले आहेत. ज्या माध्यमातून नागरिकांना सर्वोत्तम व्याजदर मिळत आहे. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड यासोबतच ज्येष्ठ नागरिक बचत योजना याशिवाय सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्याला गुंतवणुकीवर सात टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर मिळत आहे. याशिवाय आणखी एक लोकप्रिय योजना पोस्ट ऑफिस ने राबवली आहे. त्या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र योजना यामध्ये वार्षिक 6.9% व्याज मिळत आहे.

किसान विकास पात्र ही एक खात्रीशीर परतावा देणारी मनोरंजक अशी योजना आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून आपल्याला व्याजदराप्रमाणे दहा वर्षे व चार महिन्याच्या कालावधीत आपली गुंतवणूक डबल होते. म्हणजेच तुम्ही एक लाख रुपये केले असेल तर तुमचे पैसे ही योजना संपेपर्यंत दोन लाख रुपये होतील. किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून ठेवींवरील सध्याचा व्याजदर हा विविध बँकेच्या एफडी पेक्षा जास्त आहे.

मुख्य वैशिष्ट्यांवर एक नजर टाका

किमान आणि कमाल ठेव:

तुम्ही जर किसान विकास पत्र योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तिथून पुढे तुम्ही शंभर रुपयांच्या पटीत जी काही रक्कम असेल ती जमा करू शकता. विशेष म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा कोणतीही निश्चित केली नाही.

परिपक्वता:

किसान विकास पत्र योजनेच्या अंतर्गत आपण जे गुंतवणूक करतो ती गुंतवणूक वित्त मंत्रालयाच्या निर्धारित केलेल्या कालावधीप्रमाणे परिपक्व होतात. सध्या तुम्ही रक्कम जमा केली तर 124 महिन्यानंतर ती रक्कम परिपक्व होते. तुम्हाला गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम मिळते विशिष्ट परिस्थितीमध्ये या योजनेच्या माध्यमातून मुदतीपूर्व पैसे काढण्याची परवानगी देखील देण्यात आलेली आहे.

तारण:

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळानुसार तारण धारक स्वीकृती पत्राच्या माध्यमातून समर्पित पोस्ट ऑफिस मध्ये विहित नमुन्यातील अर्ज सबमिट करून घ्यावा. अशावेळी तो अर्ज सबमिट करून तारण ठेवला जाऊ शकेल, याशिवाय सुरक्षितता म्हणून हस्तांतरित देखील केला जाऊ शकेल.

अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करावी का?

पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून किसान विकास पत्र यासारख्या विविध छोट्या बचत योजना सर्व गुंतवणूकदारांना हमीचा परतावा देतात आणि मनाची शांती देखील देतात. त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना गमवावे लागत नाही तर ते पैसे काही काळानंतर दुप्पट होतात. याशिवाय मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये देखील गुंतवणूक करून तुम्ही खाजगी क्षेत्रामधील बँकेच्या FD पेक्षाही अधिक दर तुम्हाला मिळू शकतो.

याशिवाय मित्रांनो यामध्ये कोणतीही जोखीम नसल्यामुळे खात्रीशीर परतावा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मिळू शकतो. या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दुप्पट पैसे मिळू शकतात. गुंतवणूक करत असताना तज्ञ लोकांचा आर्थिक सल्ला घ्यावा.

Leave a Comment